Take a fresh look at your lifestyle.

मुस्लिम 4 विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय?

महाअपडेट टीम 13 जानेवारी 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्यावर बलात्कार केला आहे,असा खळबळजनक आरोप रेणू शर्मा नावाच्या तरूणीने याबाबतचे ट्विट करत केला आहे. यामुळे,राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

यातच आता करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दोन पत्नीसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांनी कायद्याचे उल्लंघन केलं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

तसेच मुस्लिम नागरिक चार विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर त्यात चुकीचे काय?, असा सवालही अजय सिंह सेंगर यांनी केला आहे.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

सेंगर म्हणाले की, “भारताच्या राज्यघटनेने सर्व धर्म समभाव तत्त्व स्वीकारले आहे. त्यामुळं सर्व धर्मांना विवाह बंधनाचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत. असले तरी ते निरर्थक ठरतात. फक्त हिंदू धर्मीयांनाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही.”

Advertisement

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्या करुणा शर्मा यांच्या पत्नी ठरत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केल्यानुसार त्यांचे एकच लग्न झाले आहे हे यातून स्पष्ट होते.

Advertisement
Advertisement