महाअपडेट टीम 13 जानेवारी 2021 :- अमेरिकेत जवळपास सात दशकांतून फेडरल सरकारने एका महिलेला पश्चिमी जिल्ह्याच्या अमेरिका जिल्हा न्यायालयाद्वारे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.
आज बुधवारी 52 वर्षांची लिसा मॉन्टगोमेरी या महिलेला क्रूर गुन्हेगारी प्रकरणात विषारी इंजेक्शनद्वारे ही शिक्षा सुनावण्यात आली.जस्टिस डिपार्टमेंटने लिसाला पहाटे 1: 31 वाजता मृत घोषित केले आहे.
माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सरकारने मृत्यूची शिक्षा सुनावण्याच्या अर्जाला मंजूरी दिली. त्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काही तासांनंतर लिसाच्या मृत्यूदंडाला मान्यता दिली. आरोपी महिलेल्या मानसिक परिस्थितीला पाहता तिला शिक्षा मिळणार की नाही याबाबत संशय होता.
लिसाने अत्यंत क्रूरतेने गरोदर महिलेची हत्या करुन, तिचे पोट कापून तिच्या बाळाला बाहेर काढून पळवलं होतं. ही घटना 16 डिसेंबर 2004 रोजी घडली होती. पाळीव कुत्रा विकत घेण्याच्या बहाण्याने 36 वर्षीय लिसा ने बॉबी स्टीनेट या 23 वर्षीय तरुणीच्या घरी येऊन तिची हत्या केली होती. नंतर तिचं पोट फाडून बाळाला घेऊन ती घटनास्थळावरुन फरार झाली होती.
पोलिसांनी तपास करत दुसऱ्याच दिवशी आरोपी महिलेला अटक केली होती, न्यायालयात लिसाने तिच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सन 2008 मध्ये अपहरण आणि खून केल्याबद्दल तिला दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. तिने सुटकेसाठी फेडरल कोर्टांकडे धाव घेतली परंतु काहीही फायदा न होतं शिक्षा कायम राहिली.