Advertisement

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, मात्र, ‘गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि सरकार राजीनामा घेतील असं वाटतं नाही’ !

Advertisement

महाअपडेट टीम 13 जानेवारी 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. रेणू शर्मा या तरुणीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.

Advertisement

भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Advertisement

ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होतात. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

16 hours ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

2 days ago

हृदयद्रावक घटना : फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

महाअपडेट टीम 19 जानेवारी 2021 :-  गुजरात राज्यातील सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना…

2 days ago

मुंडे प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, “जर हा माणूस खोटा असता तर…”

महाअपडेट टीम 15 जानेवारी 2021 :-  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात…

6 days ago

…पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय !

महा अप डेट 15 जानेवारी 2021 :- एकीकडे राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर…

6 days ago