महाअपडेट टीम 12 जानेवारी 2021 :-
भारताच्या सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी जवागल श्रीनाथ यांचे पहिले नाव येते. सन 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्ध (154.5 kmph) वेगाने चेंडू फेकला होता.
भारताचा दुसरा वेगवान गोलंदाजमध्ये इशांत शर्माचे नाव हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेलया कसोटी सामन्यात इशांतने (152.6 kmph) वेगाने चेंडू फेकला होता.
या यादीत तिसर्या नावावर वरुण एरोनचा समावेश आहे. सन 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने (152.5 kmph) वेगाने चेंडू फेकला होता.
चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राच्या उमेश यादव याचे नाव येते. भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे . सन 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी मालिकेदरम्यान उमेशने (152.5 kmph) वेगाने चेंडू फेकला होता.
आशिष नेहराचाही या यादीत समावेश आहे, या यादीमध्ये तो 5 व्या स्थानावर आहे. त्याने ( 149.7 kmph) वेगाने चेंडू फेकला होता. 2003 च्या वर्ल्ड कप सामन्यात डर्बनच्या क्रिकेट ग्राउंडवर झिम्बाब्वेविरुद्ध त्याने हा वेगवान चेंडू फेकला होता.
जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान 5 गोलंदाज हे आहेत :-
शोएब अख्तर – सर्वात वेगवान चेंडू: ( 161.3 kmph )
ब्रेट ली – सर्वात वेगवान बॉल: ( 161.1 kmph )
शॉन टेट – सर्वात वेगवान बॉल: ( 161.1 kmph )
जेफ थॉमसन – सर्वात वेगवान बॉल: ( 160.6 kmph )
मिचेल स्टार्क – सर्वात वेगवान बॉल: ( 160.4 kmph )