धक्कादायक ! बॉलिवूडमध्ये संधी देण्याच्या अमिषातून २००६ पासून अत्याचार, धनंजय मुंडेवर गंभीर आरोप
महाअपडेट टीम 12 जानेवारी 2021 :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेतेे धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा गंभीर आरोप केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती देखील समोर आली असून, परंतु पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, इच्छेविरुद्ध सन २००६ पासून अत्याच्यार करण्यात आला आहे. तुला जर गायिका बनायचे असले तर, तर मी बॉलीवूड मधील मोठ्या निर्मात्यांशी भेटून तुला चांगली संधी देईन’ असं आमिष दाखवण्यात आले. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
यावर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दयानंद बांगर यांनी दुजोरा दिला. मात्र पोलिस दखल घेत नसल्याने तरुणीने थेट शरद पवार, पोलिस आयुक्त, खा. सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनाही ट्वीट करुन साद घातली. याबाबत मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.