महाअपडेट 11 जानेवारी 2021 :- बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं.यात हनुमा विहारी आणि आर. आश्विन यांच्या संयमी खेळीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. एकीकडे या दोघांचं कौतुक होत असताना मात्र गायक आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी हनुमा विहारीवर टीका केली आहे.
ते ट्विट मध्ये म्हटले आहे की, फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी हा 109 चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. असंही बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे.
हनुमा विहारीने पुढाकार घेऊन जर खराब चेंडूवर प्रहत केला असता तर भारताने ऐतिहासिकी विजयाची नक्कीच नोंद केली असती. पंतकडून कोणी अपेक्षाही केली नव्हती तरीही पंतने ९७ धावा करुन दाखवलया. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला असतानाही त्यांनी संथ केली.अशी टीका बाबुल सुप्रियो यांनी केली आहे.