Take a fresh look at your lifestyle.

Corona vaccine : या राष्ट्रवादीच्या मंत्र्याला शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी

महा अपडेट 11 जानेवारी 2021 :- कोरोना लसीच्या सुरक्षिततेविषयी अद्याप काही लोकप्रतिनिधींच्या मनात शंका निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली असून 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे, परंतु राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लसीबाबत शंका व्यक्त केली आहे.

Advertisement

या शंकाच निरसन व्हावं म्हणून प्रथमतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम लस टोचून घ्यावी, यामुळे जनतेच्या मनात कोरोना लसीविषयी विश्वास निर्माण होईल. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा. अशी मागणी राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

Advertisement

ते आज (सोमवार) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी सुरु असून कोणत्याही क्षणी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु होणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

Advertisement
Advertisement