धक्कादायक ! चाकूचा धाक दाखवत ७ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
महाअपडेट टीम 10 जानेवारी 2021 :- नाशिक जिल्ह्यात अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक अशी बाब समोर आली आहे की, या प्रकरणातील आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या घरात असताना तिथे तिच्या परिचयातील एक मुलगी आली. त्यानंतर ती पिडीत मुलीला घेऊन तिच्या घरी घेऊन गेली. तिथे गेल्यावर सात नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर आईने नाशिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी 7 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलं आणि एका मुलीचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.