मराठा आरक्षण : चव्हाणांचे रक्त मराठ्याचे नाही, अजित पवारांचं रक्त सळसळत नाही का ?
महाअपडेट टीम 10 जानेवारी 2021 :- मुंबईच्या आझाद मैदानात आज मराठा क्रांती मोर्चाच्या सभेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला आहे.
यावेळी भाषणात ते म्हणाले की, मराठा आरक्षणावर अजित पवार गप्प का बसले आहेत, त्यांचं रक्त सळसळत नाही का? तसेच अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडतं म्हणाले की, चव्हाणांचे रक्त मराठ्याचे नाही, ते मराठाच नाहीत, अशोक चव्हाणांनी बदललं पाहिजे. मी पदावर होतो त्यावेळीही माझी भूमिका तीच होती आता पदावर नसतानाही माझी भूमिका बदललेली नाहीये.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनीही सरकारवर टीका केली आहे. 25 जानेवारीला कोर्टात सुनावणी होणार असून जर यावेळी आमची फसगत झाली तर सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्के आरक्षणात आम्हाला सामावून घेण्याची तयारी सरकारने करावी, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिला आहे.