Take a fresh look at your lifestyle.

सीझफायर उल्लंघन उलटलं ! भारतीय सैन्याची मोठी कारवाई, 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

महाअपडेट टीम 10 जानेवारी 2021 :-   पाकिस्तान च्या बाजूने झालेल्या सीझफायर उल्लंघनात भारतीय सैन्य दलाने 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करून उत्तर दिले आहे. भारतीय सैन्य कश्मीरमध्ये रझौरी नौसेरा सेक्टरमध्ये असताना जवानांनी ही कारवाई केली.

Advertisement

या कारवाईत 3 पाकिस्तानी सैनिकाला ठार केले आहे. अनेक सैनिक गंभीर जखमी असल्याचेही वृत्त आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या ४ चौक्याही उध्वस्त केल्या आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या सैनिक एलओसीवर सीजफायरचं उल्लंघन करत अनेकदा नौशेरा सेक्टरला टार्गेट करत होते, त्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैनिकांनी आज मोठी कारवाई केली. पाकिस्तानचे 3 सैनिक ठार करत अनेक सैनिक गंभीर जखमी केले.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

पाकिस्तानी मीडियानुसार आज (रविवारी) पाकिस्तान एक मोठी घुसखोरीचा प्लॅन आखत होता. भारतीय सैनिकांच्या असं लक्षात आलं की रजौरीच्या नौसेरा सेक्टरमध्ये एलओसीवर कलसिया इलाक्यात सीमा ओलांडून दहशतवाद्यांची एक टोळी कार्यरत होती.

Advertisement

आणि त्यांना पाकिस्तानी सेना कव्हर फायरिंग देत होती. हे दहशतवादी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होती. त्यापूर्वीच भारतीय सैन्याने त्यांचा हा डाव उधळून लावला.

Advertisement
Advertisement