महाअपडेट टीम 10 जानेवारी 2021 :– दिल्ली सीमेवर सुरू असलेला शेतकरी आणि सरकारमधील तणाव वाढतच चालला आहे,त्याचवेळी हरियाणाच्या कर्नालमध्ये पोलिस आणि निषेध करणारे शेतकरी यांच्यात संघर्ष चालू झाला आहे. करनालच्या कमला गावात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा कार्यक्रम होणार होता,
परंतु तेथे मोठ्या संख्येने शेतकरी तेथे पोहोचले होते, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर येताच शेतकऱयांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू केली. यावर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करत तसेच अश्रुधुराचे गोळे सोडले .
हे शेतकरी कृषी कायद्यास विरोध करीत होते. या करनाल गावात आयोजित महापंचायतीत खट्टर हे कृषी कायद्याच्या फायद्यांबद्दल माहिती देणार होते परंतु . तिथे आलेल्या शेकडो शेतकर्यांनी त्यांना फक्त काळे झेंडेच नाही तर कायद्यांविरोधात घोषणाबाजीही केली.
मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणाखाली तैनात सुरक्षा दलाने आणि स्थानिक पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला आणि त्यांना पांगवले. नंतर अश्रुधुराचे गोळे सोडून गोळीबार करावा लागला.