Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर : सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा, 2 लाखांपर्यंतच्या खरेदीवर सरकारने दिलीये ‘ही’ सूट

महाअपडेट टीम 10 जानेवारी 2021 :-  आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. खरं तर, दोन लाखांपर्यंत सोनं खरेदी करणार्‍यांना सरकारने मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. महसूल विभागाने (Department of Revenue) स्पष्टीकरण दिले आहे की, दोन लाख रुपयांपर्यंतच्या सोने, चांदी, दागिने आणि मौल्यवान रत्ने खरेदी करण्यावर केवायसीला ( KYC) अनिवार्य नसणार आहे. म्हणजेच दोन लाख रुपयांपर्यंतचे सोने, चांदी आणि इतर दागिने खरेदीवर ग्राहकांना केवायसीचे कोणतेही कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही.

Advertisement

यापूर्वी 2 लाख रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या खरेदीवरही दुकानदार केवायसी कागदपत्र म्हणून ग्राहकांकडून पॅन, आधार किंवा इतर कागदपत्रांची मागणी करत होते, परंतु पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) च्या अंतर्गत 28 डिसेंबर रोजी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जेव्हा ग्राहक एका महिन्यात 10 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीचे दागिने विकत घेतील तेव्हाच केवायसीचा ( KYC) नवा नियम लागू होईल.

Advertisement

अर्थ मंत्रालयाच्या मते, दागिने मोडून येणारी रक्कम ही दोन लाख रुपयांहून अधिक असेल तर सोन्याच्या दागिन्यांवर तुम्हाला पॅन किंवा आधार अनिर्वाय असणार आहे. आणि हा नियम अजूनही कायम आहे.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

खरं तर,फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स (FATF) जगभरातील दहशतवाद्यांना मनी लाँड्रिंग आणि आर्थिक मदतीवर नजर ठेवत आहे. एफएटीएफचे हे धोरण दहशतवादी निधी आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित बेकायदेशीर क्रिया थांबविणे आहे. एफएटीएफच्या शिफारशीनुसार ग्राहक जेव्हा विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करतात तेव्हा मौल्यवान धातू आणि रत्ने खरेदी करण्यासाठी केवायसीची आवश्यकता असते.

Advertisement

वास्तविक, अलीकडेच मीडियामध्ये असे अहवाल आले होते, की सोने, चांदी, दागदागिने किंवा मौल्यवान रत्ने खरेदी जरी ती 2 लाखांपेक्षा कमी असली, तरी तुम्हाला केवायसीची ( KYC) ची आवश्यकता होती. आता हे चुकीचे असल्याचे महसूल विभागाने डीओआर (Department of Revenue) स्पष्ट केले आहे. म्हणून आता ज्वेलर्स 2 लाखांपेक्षा कमी खरेदीवर तुम्हाला केवायसी ( KYC) मागणार नाही.

Advertisement
Advertisement