Take a fresh look at your lifestyle.

सीएम ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची लस मोफत मिळणार

महाअपडेट टीम 10 जानेवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या संसर्गाची गती जरी मंदावली असली तरी पण अद्याप धोका कायम आहे. कोरोनाचा वेग रोखण्यासाठी सरकारने नवीन वर्षात दोन लशींना (कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ही लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, राज्यातील सर्व गरजू लोकांना कोरोना ही लस मोफत देईल. राज्य सरकार यासाठी व्यवस्था करत असल्याचे ममता यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभेचे वारे वाहत असतानाच निवडणुकीपूर्वी ममता सरकारने ही मोठी घोषणा केली आहे.

Advertisement

भारतभर 6 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होत आहे, त्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यातील लोकांना कोरोनाची लस विनामूल्य देण्याचे निश्चित केले आहे तथापि, ही लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होईल यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोक, परंतु या लोकांकडून पैसे घेतले जातील की नाही, हे केंद्र सरकारने अद्याप सांगितले नाही.

Advertisement

दरम्यान, दिल्लीसह अनेक राज्यांनी देशवासियांना कोरोना लस विनामूल्य मिळावी अशी मागणी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी, भाजपने असेही आश्वासन दिले होते की, जर त्यांचे सरकार आले तर सर्व लोकांना कोरोना लस विनामूल्य दिली जाईल.परतू दरम्यानच्या काळात यावर बीजेपीने कोणतेही भाष्य केले नाही.

Advertisement

विधानसभेच्या २९४ जागा असलेल्या पश्चिम बंगाल या राज्याच्या यावर्षी एप्रिल-मेमध्ये निवडणुकादेखील होणार आहेत. यामुळे ममतांच्या या घोषणेला महत्त्व आहे. ममता बॅनर्जी यांनी एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, “आमचे सरकार विनाशुल्क राज्यातील सर्व लोकांना कोरोना लस लावण्याची व्यवस्था करीत आहे, हे जाहीर करताना मला आनंद होतं आहे.

Advertisement
Advertisement