Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी ! 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण होणार, केंद्र सरकारची घोषणा

महाअपडेट टीम 9 जानेवारी 2021 :-  कोरोना लसीकरणाची प्रतिक्षा संपली असून येत्या 16 जानेवारीपासून देशभर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. पहिल्यांदा ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना नागरिकांना लस दिली जाणार आहे. यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या बैठकीत हा निर्णय झाला असून त्या बैठकीला पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे सचिव, कॅबिनेट सचिव उपस्थित होते.

Advertisement

कोरोना प्रतिबंधक दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. परंतु आता सीरमने उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement