महाअपडेट टीम 9 जानेवारी 2021 :- इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी 2017 पासून श्रीमंत असलेल्या अमेझॉनच्या जेफ बेझोसला मागे टाकले आहे. आज एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे.त्याची संपत्ती 188 अब्ज अमेरिकन डॉलर्संपेक्षा जास्त आहे जी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या 187 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक अब्ज डॉलर्स आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने आयुष्याच्या धडपडीत कमी बोलले आणि जास्त काम केले आहे. त्याच्या आयुष्यातील बर्याच गोष्टी अशा आहेत ही त्या प्रत्येक तरुणांनी शिकल्या पाहिजेत.
एलोन मस्कचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी तो कॅनडाला आला. ग्रंज वेबसाइटच्या अहवालानुसार,एलोन लहान असताना इतका आत्मविश्लेषी होता की, त्याच्या पालकांना वाटायचे की तो बहिरा आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांनाही दाखवले होते.
एलोनच्या आईला असे समजत गेले की, एलोन हा दिवसा स्वप्नात हरवत असे. त्याच्या आईने एका मुलाखतीत असा खुलासा केला ही, बर्याच वेळा असे घडले की, तो स्वतःच्या जगात हरवत होता, त्याला त्याच्या आजूबाजूला काय चालले आहे याची अजिबात सुधबुधचं नव्हती.
पूर्वी मी त्याला पाहून अस्वस्थ व्हायची पण आता मी त्याला एकट सोडते, कारण मला माहित आहे की तो त्याच्या मनात रॉकेट डिझाइन करीत आहे.
एलोनचा त्याच्या वडिलांशी जास्त संबंध येत नव्हता. एलोनच्या वडिलांनी कधीही त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा दिला नाही. आणि एलोनने असे सांगितले आहे की त्याचे बालपण खूप समस्यांनी भरलेले होते. एलोननने बर्याच वेळा वडिलांशी बोलणेही थांबवले होते. एकदा तर एलोनच्या वडिलांनी त्यांच्या घरात घुसलेल्या तीन चोरांनाही गोळ्या घातल्या होत्या.
एलोन जो लहानपणापासूनच एक बुद्धिमान व्यक्ती होता, त्याने 9-10 व्या वर्षापासून कंप्यूटर प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली. एलोनने स्पेस थीमसह जोडणारा एक कंप्यूटर गेम बनविला. आणि तो 500 डॉलर्समध्ये कंप्यूटरच्या मासिकाला विकला. या गेमचे नाव ब्लास्टार असून ते आजही आणि ते आजही ऑनलाइन खेळले जाऊ शकते. एलोननं त्याच बालपण हे बहुतेक पुस्तकांमध्येच जास्त घालवले होते. तो 10-10 तास पुस्तकांमध्ये गुंतून राहायचा. वृत्तानुसार एलनने वयाच्या नऊव्या वर्षी इनसाइक्लोपिडीया ब्रिटैनिका पूर्ण केली आणि त्यानंतरचं त्याची सायन्स फ्रिक्शनच्या पुस्तकांमध्ये रुची वाढू लागली.
लहानपणी इतर विद्यार्थ्यांनी त्याला धमकावले होते, बर्याच ठिकाणी त्याना या घटनेचा उल्लेख केला आहे. एकदा, काही मुलांनी त्याला शिडीवरून खाली ढकलून देऊन ठार मारण्याचा प्रयत्नही केला गेला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात जावे लागले होते, त्यावेळेस ते जीवालाही मुकले गेले असते. म्हणूनच एलोनने वयाच्या 15 व्या वर्षी कराटे आणि ज्युडोचे प्रशिक्षण घेतले होते.
एलोन मस्कला दक्षिण आफ्रिकेत सैन्यात सामील व्हायचे नव्हते, म्हणून ते कॅनडामध्ये आले होते. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी गेले होते, परंतु केवळ दोन दिवसांत ते या विद्यापीठातून परत आले. खरं तर इंटरनेट युगाच्या भरभराटीचा फायदा घेण्याचा निर्णय एलोन यांनी 90 च्या दशकात घेतला होता.
त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर एलोन मस्कने 2000 मध्ये कॅनेडियन लेखक जस्टिनशी लग्न केले होते. हे संबंध आठ वर्षे टिकले. एलोन आणि जस्टिन यांचे 2008 मध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर, त्याने 2010 मध्ये ब्रिटिश अभिनेत्री तालुला राइलीशी लग्न केले. परंतु दोन वर्षांनंतर त्यांचेही संबंध संपुष्टात आले होते.
नंतर 2013 साली एलोन मस्कने पुन्हा लग्न केले परंतु ते फार काळ चलता तीन वर्षानंतर ते पुन्हा विभक्त झाले होते. यानंतर एलोन मस्क आणि सुपरस्टार अभिनेत्री एंबर हर्ड यांच्यातील रिलेशनमुले सोशल मिडियावर बरीच मथळे बनले पण व्यस्त शेड्यूलमुळे दोघांचेही लवकरच ब्रेकअप झाले.
एलोन मस्कला त्याची पहिली पत्नी जस्टिनपासून 6 मुले आहेत, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. एलोन आणि त्याच्या गर्लफ्रेंडला यावर्षी मे महिन्यात एक मुलगा झाला त्याने त्याचे नाव एक्स X Æ A-12 ठेवले होते परंतु नंतर ते बदलून X Æ A-Xii केले. यामुळे अॅलन सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.
मस्क यांनी मागील एका वर्षात दर तासाला 1.736 कोटी डॉलर म्हणजेच 127 कोटी रुपये कमावले आहे. ते प्रत्येक सेकंदाला 67 लाख रुपये होतात. परंतु पैशांकडं न पाहता त्याच्या मनात नवीन कल्पना विकसित करण्यास तो मग्न असतो. एलोन मस्क हे आतापर्यंत आठ कंपन्यांचे संस्थापक आहेत, ज्यात स्पेस एक्स, टेस्ला, हायपरलूप आणि बोरिंग कंपनीचा समावेश आहे.
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- बघा हे सांगणं बरोबर नाही कि,जास्तीत जास्त हृदयविकाराचा झटका…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या 2020-21 चा अर्थसंकल्प दुपारी…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- जयपूर: पोलिसांच्या खाकीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी घटना घडली आहे.…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाला आपल्या भविष्याची…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- शतावरी एक औषधी वनस्पती आहे जी स्त्रियांमध्ये नैसर्गिक कामोत्तेजना…