महाअपडेट टीम 9 जानेवारी 2021 :- भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात मध्यरात्री २ च्या सुमारास लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे होतं. या घटनेत संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत राज्य सरकारही जागं होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून संपूर्ण रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहे.
तर या धक्कादायक घटनेत मृत बालकांच्या परिवारास प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.परंतु या घटनेत मृत पावलेल्या बालकांत अधिकाधिक बालिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेत आगीनंही लक्ष्मीलाच गाठलं आहे.
मुलींच्या आईचा आक्रोश पाहून मन सुन्न होतंय, या लेकरांच्या जाण्याने आई आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत बाळांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दहा दिवसांपासून माझ्या मुलीला दूध पाजण्यासाठी जाऊ दिले नाही, या घटनेत आमची मुले मेली परंतु कुणी डॉक्टर, नर्स यांना काहीचे कसे झाले नाही असा संतप्त सवाल नातेवाईकांनी विचारला आहे.
या बालिकांचा आगीत मृत्यू झालाय –
१) वंदना मोहन शेडाम, रावनवाडी, भंडारा
– सात दिवस
२) योगीता विकेष धुळसे, श्रीनगर भंडारा
– एक दिवस
३) प्रियंका जयंती बसूशंकर, जाम भंडारा
– एक महिना
४) कविता बारेलाल कुमरे, लेंडेझरी खापा भंडारा
– तीन दिवस
५) सुकेशनी धर्मपाल आगरे, उसरला, भंडारा
१२ दिवस
६) दुर्गा विशाल रहांगडाले, डाकला
10 दिवस
७) गिता विश्वनाथ बैरे, गोजापूर, भंडारा
२ महिने
८) हिरकन्या हिरालाल भानारकर, उजगाव साकेली
7 महिने
महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :- शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले अनेक नेते…
महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :- भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडला…
महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :- डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन…
महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :- मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…
महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :- मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअॅप चॅट लीक…