Take a fresh look at your lifestyle.

हृदय पिळवटून टाकणारी भंडाऱ्याची घटना : जिल्हा रुग्णालयात आग, 10 नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू ,

महाअपडेट टीम 9 जानेवारी 2021 :- भंडारा शासकीय जिल्हा रुग्णालयात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या शासकीय जिल्हा रुग्णालयाला आग लागल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या या आगीत दहा चिमुकल्यांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला आहे. तर, सात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.

Advertisement

शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास ही आग आग लागली. जिल्हा रूग्णालयाच्या आऊटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं समोर आल्याने ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिला असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.

Advertisement

त्यानंतर दवाखान्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तातडीने हालचाल करून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.

Advertisement

ज्या ठिकाणी आग लागली होती, त्या विभागात आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचले. तर, आऊट बाॅर्न युनिटमधील दहा मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला.

Advertisement
Advertisement