महाअपडेट टीम 6 जानेवारी 2021 :- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने अंतिम -11 ची घोषणा केली. तिसर्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा संघात परतला आहे. या सामन्यात रोहित भारताच्या सलामीला फलंदाजी करताना दिसेल.
त्याचबरोबर वेगवान गोलंदाज नवदीप सैनी व्हाईट जर्सीने भारताकडून पदार्पण करीत आहे. मेलबर्न येथे झालेल्या कसोटी सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले.त्यानंतर नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र अखेर नवदीप सैनीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज