महाअपडेट टीम 5 जानेवारी 2021 :- टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. वुडलँड हॉस्पिटलने आज मंगळवारी याबाबतची माहिती दिली.
जिम करताना छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून गांगुली यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सखोल उपचारानंतर त्याला सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता.त्यामुळे त्याच्या धमनीमध्ये तीन ब्लॉक सापडले होते. दरम्यान, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ देवी शेट्टी यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली आणि माजी कर्णधारावर उपचार केले.
गांगुलीची पत्नी डोना यांनी काही वेळापूर्वी रुग्णालयात भेट दिली. हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, गांगुलीने डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला
बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, विशेष म्हणजे, वैद्यकीय पथकाने सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉ. शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती.