Advertisement

गणेश नाईकांना पुन्हा धक्का; भाजपच्या आजी-माजी नगरसेवक दाम्पत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Advertisement

महाअपडेट टीम 5 जानेवारी 2021 :-  नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नवी मुंबई भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या वारंवार होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे गणेश नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच दिव्या गायकवाड या मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 64 मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या.

Advertisement

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासह गायकवाडांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता गायकवाड दाम्पत्याने पुन्हा राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

2 days ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

3 days ago

हृदयद्रावक घटना : फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

महाअपडेट टीम 19 जानेवारी 2021 :-  गुजरात राज्यातील सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना…

3 days ago

मुंडे प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, “जर हा माणूस खोटा असता तर…”

महाअपडेट टीम 15 जानेवारी 2021 :-  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात…

1 week ago

…पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय !

महा अप डेट 15 जानेवारी 2021 :- एकीकडे राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर…

1 week ago