Take a fresh look at your lifestyle.

करण जोहरच्या मदतीला धावले गौतम अदानी, धर्मा प्रॉडक्शनमध्ये करणार इतकी गुंतवणूक

 महाअपडेट टीम 5 जानेवारी 2021 :-  करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवत असते. सध्या करण जोहर हा शांतपणे काम करताना दिसत आहे . २०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर तो बऱ्याच वेळा ट्रोल झाला होता, त्यामुळे या दुःखातून सावरत त्याला एक लॉटरी लागली आहे

Advertisement

बलाढ्य अदानी ग्रुपचे गौतम अदानी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत आणि तशी चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

अदानी ग्रुपचे देशव्यापी नाव आहे. ऊर्जा, संसाधने, रसदशास्त्र, शेती व्यवसाय, रिअल इस्टेट, वित्तीय सेवा इ. मधील एक प्रतिष्ठित नाव बनले आहे. तर करण जोहरची धर्मा प्रोडक्शन ही देशातील आघाडीची फिल्म कंपनी आहे. त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Advertisement

गेल्या वर्षी धर्म प्रॉडक्शनने कॉर्नरस्टोन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीशी हातमिळवणी करून धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी ही नवीन कंपनी सुरू केली आहे . त्याचबरोबर अलीकडेच धर्माने पाच चित्रपट बनविण्याच्या
लाइका प्रॉडक्शनबरोबर करारही केला आहे.

Advertisement

करण जोहर सध्या शेरशहा, दोस्ताना 2, जुग जुग जिओ, फाइटर, तख्त यासारखे चित्रपट तयार करत आहे. जर अदानी ग्रुप आणि धर्मा प्रॉडक्शन आले तर ते नक्कीच बॉलिवूड आणि करण जोहरसाठी फायद्याच ठरणार आहे.

Advertisement
Advertisement