Take a fresh look at your lifestyle.

फेसबुक लाइव्हवर करत होता आत्महत्या, गळ्यावर, हातावर वार करत रक्तबंबाळ अवस्थेत साता समुद्रापार फेसबुक हेडक्‍वॉर्टरने पहिले, आणि मग …!

महाअपडेट टीम 5 जानेवारी 2021 :-  आभासी जगाने वास्तवाचे आयुष्य किती पकडून ठेवले आहे. प्रत्येकजण त्यांच्या वैयक्तिक जीवनाची छायाचित्रे, सोशल मीडियावरील व्हायरल करण्यासाठी या माध्यमांचा वापर करत असतो. परंतु जर कोणी स्वत: ची आत्महत्याच या फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून दर्शवत असेल तर त्याला काय म्हणावं.

Advertisement

अशीच एक धक्कादायक घटना महाराष्ट्रातील धुळे येथे घडल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. धुळे येथील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील (वय 23) हे आत्महत्या करीत होता. त्याने फेसबुकचे लाइव्ह करून गळ्यावर, हातावर वार करत होता. म्हणजेच, जेव्हा तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यावेळी लोक त्याला पहातही होते परंतु त्याला समजाण्यापलीकडे काही करू शकत नव्हते.

Advertisement

थेट व्हिडिओमध्ये तो म्हणत होता, ‘प्रत्येकजण मला खूप त्रास देत आहे. म्हणून मी माझं आयुष्य संपवत आहे, असे म्हणत या वेळी तो गळ्यावर ब्लेडने वार करत होता आणि जोरात रडत होता. हे सर्व चालू असताना, बरेच लोक त्याला प्रत्यक्षात पहात होते पण त्यांना काही करता येत नव्हते.

Advertisement

त्याचवेळी भारतापासून सुमारे 7 हजार 695 कि.मी. अंतरावर आयर्लंडमधील फेसबुकच्या मुख्य कार्यालयात बसलेल्या काही कार्माच्यांनी हा व्हिडिओ पाहिला. त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधला आणि एक युवक थेट व्हिडिओवरून आत्महत्या करत असल्याचे संगीतले.

Advertisement

मुंबई सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी धुळे पोलिसांना माहिती दिली व तेथून एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि अवघ्या 1 तासाच्या आत त्या तरूणाचा जीव वाचवला.

Advertisement

सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी माध्यमांना सांगितले की, रात्री आठच्या सुमारास आम्हाला आयर्लंडच्या फेसबुक मुख्यालयातून फोन आला की महाराष्ट्रातील एक युवक स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे. वारंवार ब्लेडने त्याच्या गळ्यास वार करत आहे. त्याच्या दोन्ही हात आणि गळ्यातून रक्तस्त्राव होत आहे. आम्ही त्वरित आमच्या कार्यसंघाला सतर्क केले आणि या व्यक्तीचा शोध घेण्यास सांगितले.

Advertisement

रश्मी रश्मी करंदीकर पुढे म्हणाल्या की ही व्यक्ती महाराष्ट्रातील धुळे येथील आहे. थोड्या वेळानंतर, आम्हाला त्याचे लोकेशन शोधावे लागले. आम्ही नाशिक रेंजचे आयजी प्रताप दिघावकर आणि धुळेचे एसपी चिन्मय पंडित यांना याची खबर दिली. दरम्यान, सायबर सेलला त्याचे लोकेशन मिळाले असता रात्री 9 वाजता धुळे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि ज्ञानेश्वर पाटील याला वाचविण्यात यश आले. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले.

Advertisement
Advertisement