महाअपडेट 4 जानेवारी 2021 :- इंडिया बायोटेक लस ‘कोवाक्सिन’ यांना आपत्कालीन वापरासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) रविवारी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आनंदाची बातमी अशी की देशात कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. तसेच या कोवाक्सिनला 12 वर्षांवरील मुलांच्या चाचणीसाठीही मान्यता देण्यात आली आहे. तर सीरम संस्थेची कोविशिल्ट फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल.
भारत बायोटेकने दुसऱ्या टप्यात 12-18 वर्षांच्या मुलांवरही लसीची ट्रायल करुन पाहिली आहे. परंतु डीसीजीआयने आपत्कालीन परिस्थितीत क्लिनिकल ट्रायल मोडमध्ये लसीचा मर्यादित वापर करण्यास मान्यता दिली आहे. आणि त्यामध्ये 12 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांचा समावेश आहे. तथापि, सध्या सरकारचे प्राधान्य हे लवकरात् – लवकर 30 करोड लोकांना लस देन्याचे आहे. त्यामुळे सध्या तरी मुलांना यातून वगळण्यात आले आहे.
कॉव्हशील्ड 18 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तिंनाच देनार
भारत सरकारने आतापर्यंत मंजूरी केलेल्या दोन लसींपैकी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेले कोविशिल्ट आहे, त्यास प्राधान्य देण्यात आले आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तिंना देण्यात येईल. तर हैदराबादच्या भारत बायोटेकने बनवलेले स्वदेशी कोव्हॅक्सिन ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाऊ शकते.
लसीकरण मोहीम लवकरच सुरूः
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी एका कार्यक्रमात सांगितले की, लवकरच जगात सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. यासाठी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांचे आभार करतो. ते पुढे म्हणाले की, सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी चर्चा करून संवाद साधला पाहिजे. मेड इन इंडिया उत्पादनांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, आम्हाला जग भारतीय उत्पादनांनीच भरायचे नाही, परंतु जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय उत्पादनांसाठी आपण प्रत्येक ग्राहकांचे मन जिंकले पाहिज