Take a fresh look at your lifestyle.

हळदीचे दूधही घातक ठरू शकतं. जाणून घ्या, हळदीचे दूध कोणी प्यावे कोणी पिऊ नये ?

महाअपडेट टीम, 30 डिसेंबर 2020 :  हळदीच्या दुधाचे बरेच फायदे आहेत, परंतु काही लोकांनी हळदीच्या दुधाचे सेवन केले तर ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं. जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी हळदीच्या दुधाचे सेवन करु नये?

Advertisement

जर पित्ताशयामध्ये स्टोन/ खडा असेल तर त्या लोकांनी कधीच हळदीचे सेवन करू नये.

Advertisement

जर रक्तस्त्रावची समस्या उद्भवली असेल तर हळदी चे दुध तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी होते, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याची समस्या अधिक उद्भवू शकते.

Advertisement

गरोदरपणात हळदीचे दूध कधीच घेऊ नका. यामुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचित होऊ शकतात. तसेच गर्भाशयात रक्तस्त्राव किंवा गर्भाशयात पेटके निर्माण होण्याची संभावना असते.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

हळदमध्ये करक्यूमिन नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो, जो रक्तातील साखरेवर परिणाम करतो. अशा परिस्थितीत आपल्याला मधुमेह असल्यास आपण हळद असलेले दूध पिणे टाळावे.

Advertisement

लिव्हरमध्ये वाढ झालेली असल्यास हळदीच्या दुधाचे अजिबात सेवन करू नका, अन्यथा लिव्हरमध्ये समस्या उद्भवू शकते.

Advertisement

हळद टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करू शकते. यामुळे शुक्राणूंची सक्रियता कमी होते. जर तुम्ही फैमिली प्लानिंग करत असाल तर हळदचे दूध न घेण्याचा प्रयत्न करा.

Advertisement
Advertisement