महाअपडेट टीम, 30 डिसेंबर 2020 : – भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर एक क्रिकेट युद्धचं जिंकायची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ हा मोठ्या दौऱ्यावर गेला आहे. या ठिकाणी वनडे आणि टी -२० मालिका संपल्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दावेदार मानले जात नव्हते. इतकच नाहीतर काही ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेट पटुंनी भारत ४-० ने मालिका हरणार अशी भविष्यवाणीही केली होती.
विराट कोहली गेल्यानंतर अजिंक्य रहाणेसमोर एक आव्हान होते.
चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला अॅडलेडमध्ये खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीही भारतात परतल्याने कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर पडली.
विराट कोहलीने पितृत्व रजा घेतल्यानंतर अजिंक्य रहाणे कसोटीतील उर्वरित सामन्यांसाठी काळजीवाहू कर्णधार म्हणून काम पाहत आहे. कोहली सुटल्यानंतर आणि शमीच्या दुखापतीनंतर अजिंक्य रहाणेला एका कठीण आव्हानाचा सामना करावा लागला.
रहाणेच्या कर्णधारपदामुळे मेलबर्नमध्ये भारताला जिंकता आले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचा दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला, तेथे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारत संघात खूपच बदल दिसून येत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने हरवून भारताने मालिकेत बरोबरी साधली.
या सामन्यात अजिंक्य रहाणेने स्वत:ची जबाबदारी स्वीकारली आणि भारताला दिसणाऱ्या अडचणी दरम्यान कर्णधार म्हणून नव्हे तर लीडर म्हणून काम केले. पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने शानदार शतक ठोकले आणि दुसर्या डावात महत्त्वपूर्ण खेळी खेळत सामन्याचा नायक ठरला. त्याने संघातील प्रत्येक सदस्याला विश्वासात घेऊन संघाचे नेतृत्व केले.
अजिंक्य रहाणेची कर्णधारपदाची कामगिरी पाहून त्याला कसोटीचे नेतृत्व देण्यात यावे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ज्या प्रकारे अजिंक्य रहाणेने शांत मनाने कर्णधारपदी काही खास निर्णय घेतले. गोलंदाजीतील बदलाबरोबरच त्याने संघाच्या निवडीतही उत्तम कामगिरी केली. त्याने फलंदाजीद्वारे सगळ्यांना चकित केले.
रहाणेने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व करण्याचे कौशल्य दाखविले त्यावरून आता सर्वजण प्रभावित झाले आहेत. रहाणे हा बरीच वर्षे भारतीय संघाचा उपकर्णधार होता, दरम्यानच्या काळात विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे त्याने ज्या सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली, जिथे भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळेच आता असे दिसते आहे की अजिंक्य रहाणेला पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाचा मान भेटायला हवा.