Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी: टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची या दिवशी होणार भारतात एंट्री, नितीन गडकरींनी दिली माहिती

महाअपडेट टीम, 29 डिसेंबर 2020 :  जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच आपल्या गाड्यांची विक्री भारतात सुरू करणार आहे. पुढील वर्षी ही कंपनी भारतात काम सुरू करणार असल्याचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भारतातील लोक बर्‍याच काळापासून अमेरिकन दिग्गज ऑटो कार टेस्लाची वाट पाहत होते.

Advertisement

आता या ऑटो निर्माता कंपनीच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक मोठी बातमी आहे. ही इलेक्ट्रिक कार बनविणारी अमेरिकन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनीही सांगितले होते की, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही कार भारतात येईल.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला 2021 च्या जानेवारीपर्यंत अधिकृतपणे भारतीय बाजारात उतरण्याची तयारी करत आहे. अहवालानुसार, टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार मॉडेल 3 चे प्री-बुकिंग सुरू करेल. आणि त्यानंतर जून अखेरीस किंवा Q1 2021-2022 पर्यंत कारची विक्री सुरू करेल.

Advertisement

सध्या ही कंपनी रेडिमेड मोटारींची विक्री करणार

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

नितीन गडकरी यांनीही सांगितले की, कंपनी प्रथम आपल्या मेड इन इंडिया कारची विक्री सुरू करेल. यानंतर, प्राप्त झालेल्या प्रतिक्रियेच्या आधारे मोटारी एकत्रित करुन स्थानिक स्वरूपात तयार केल्या जाऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये एलोन मस्क यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की 2021 मध्ये टेस्ला भारतीय बाजारात प्रवेश करेल. टेस्लाचीही देशात एक R&D सेंटर आणि बॅटरी मॅन्यूफॅक्चरिंग युनिट उघडण्याची योजना आहे.त्यामुळे टेस्ला ही सन २०१६ पासून आपली उत्पादने भारतीय बाजारात आणण्याविषयी बोलत आहेत.

Advertisement

टेस्ला मॉडेल 3 संपूर्णपणे तयार केलेल्या युनिटच्या रूपात भारतात येईल. शक्यतो ही कंपनी डीलरशिपच्या माध्यमातून आपल्या गाड्यांची विक्री करणार नसल्याचं सांगता येत आहे. टेस्ला मॉडेल 3 कारची किंमत 55 लाख रुपये असू शकते.

Advertisement

टेस्ला मॉडेल 3 कार एका चार्जमध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करू शकते. या इलेक्ट्रिक कारचं टॉप स्पीड 162 कि.मी प्रतितास आहे.  ही कार 3.1 सेकंदातच 0 ते 100 कि.मी चा वेग संपादित करू शकते.  तथापि, कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.

Advertisement
Advertisement