या ८ गोष्टी फक्त जिम जाणाऱ्या तरुणांनाच माहिती असतात !
महाअपडेट टीम, 28 डिसेंबर 2020 : जर तुम्ही जिममध्ये कठोर परिश्रम करत असाल, आणि जर तुम्ही योग्य खुराक घेत नसाल तर तुमच्या शरीरावर कुठलाही परिणाम दिसणार नाही.
बहूतेक जण जिममध्ये गेल्यानंतर वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग करायला कंटाळा करतात. परंतु असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं, म्हणून कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी किमान ५ मिनिटे वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग जरूर करा.
जर तुम्हाला शरीरात जास्त मांस आणायचे असेल तर तुम्हाला जास्त वजन उचलावं लागेल आणि कमी सेट मारावे लागेल. तुम्हाला शरीराला आकार द्यायचा असेल तर कमी वजन उचलून जास्त सेट मारणे गरजेचे आहे.
जिमनंतर लगेचच तुम्ही प्रथिनेयुक्त पदार्थ खा, जे तुम्हाला भरपूर फायदे देईल. जसे की मांस, अंडी, मासे, चीज, पनीर इत्यादींसारखे
आठवड्यातून कमीत कमी चार दिवस जिम करा. आणि दररोज शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा व्यायाम करा जसे की सोमवारी चेस्ट, मंगळवारी लेग्स, बुधवारी शोल्डर, इ.
लक्षात ठेवा की, व्यायामा नंतर शरीराला विश्रांती देण आवश्यक आहे. त्यामुळे किमान ८ तास तरी झोप घेणे गरजेचे आहे.
जर तुम्ही लवकर शरीरयष्टी बनविण्याच्या हेतूने तुमचे मित्र किंवा जीम ट्रेनर यांच्या प्रभावाखाली येऊन कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन (स्टिरॉइड) किंवा स्टिरॉइड घेऊ नका, घेतल्यास याचा थेट परिणाम तुमच्या मूत्रपिंडावर होईल.
शरीर बनवने ही काही दिवसांची कसरत नसून ती टिकवण्यासाठी आणि कायम राखण्यासाठी कठोर परिश्रम करणे महत्वाचे आहे.