Take a fresh look at your lifestyle.

रात्री झोपायच्या आधी तुम्ही किती पाणी पिलं पाहिजे? जाणून घ्या… नाहीतर तुमचं मूत्रपिंड निकामी होऊ शकतं !

महाअपडेट टीम, 28 डिसेंबर 2020 : जर तुम्हाला पाणी पिण्याची पद्धत जर योग्य नसेल तर ते खूप हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे पाणी कधी आणि कसं प्यायला हवं हे देखील जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जेवणानंतर रात्री झोपायच्या आधी पाणी प्यावे की नाही हे बर्‍याच लोकांची समस्या आहे.

Advertisement

तस जर पाहिलं तर रात्रीच्या वेळी थोडे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण अन्न खाल्ल्यानंतर आपल्या अन्ननलिकेत बरेच अन्न शिल्लक राहते, म्हणून जर आपण पाणी प्यायले तर आपल्या अन्नानालीकेमध्ये अडकलेले अन्न आपल्या पोटात जाते, आणि आपली अन्ननलिका स्वच्छ होते.

Advertisement

परंतु जर आपण जास्त पाणी प्यायले तर त्याचा आपल्या मूत्रपिंडावर अधिक परिणाम होतो, ज्यामुळे आपले मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण रात्री आपण जे जास्त पाणी पितो त्याचा आपल्याला शरीराला काही उपयोग होत नाही, म्हणूनच किडनीवर ताण येण्याची शक्यता असते.

Advertisement

तसेच रात्री झोपायच्या आधी पाणी पिण्यामुळे आपल्याला रात्री लघवी करण्याची आवश्यकता वाढू शकते.त्यामुळे तुम्हाला झोपेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. तसेच उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी, वजन वाढणे या गंभीर आजारांना तुम्ही बळी पडू शकता.

Advertisement

जर तुम्ही झोपेच्या आधी एकच ग्लास पाणी प्याल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.आणि यामुळे डिहायड्रेशनचा धोका देखील दूर होतो.

Advertisement

झोपेच्या वेळेपूर्वी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकले तर चांगले आहे, कोमट पाणी पिण्यामुळे शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे अधिकाधिक घाम फुटतो. घाम आल्याने रक्त परिसंचरण सुधारते. आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. म्हणून रात्री झोपायच्या आधी हलकं गरम किंवा कोमट पाणी प्या.

Advertisement
Advertisement