महाअपडेट टीम, 27 डिसेंबर 2020 :–डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरोधकांना नेहमीच रिंगमध्ये हरवणारा ल्यूक हार्पर जीवनाच्या युध्दात पराभूत झाला. डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार आणि माजी आयसी चॅम्पियन ल्यूक हार्पर यांचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाले आहे. ल्यूक हार्पर बराच काळ फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होता, उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
ल्यूक हार्परच्या मृत्यूची माहिती त्याची पत्नी अमांडा यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. लूकचा मृत्यू हा फुफ्फुसातील आजाराने त्रस्त असताना झाल्याचे सांगितले.
ल्यूक हार्परची पत्नी अमांडाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज माझ्या जिवलग मित्राचा मृत्यू झाला. मला ते शब्द लिहायचे नव्हते. माझे हृदय तुटले आहे.
त्याने जगाला एका अद्भुत रीतीने पाहिले, परंतु तो माझा चांगला मित्र, माझा नवरा आणि खूप चांगला वडील होता. माझ्या मनात असलेले प्रेम किंवा सध्या मी किती तुटलेले आहे हे कोणत्याही शब्दातून व्यक्त करता येत नाही. ‘