Advertisement

आयसीसीने घोषित केला या दशकातील सर्वोत्कृष्ट टी २० संघ, कॅप्टनसह या ४ भारतीय खेळाडूंचा आहे संघात समावेश

Advertisement

महाअपडेट टीम, 27 डिसेंबर 2020 :- आयसीसीने आज दशकाची सर्वोत्तम टी -20 संघाची घोषणा केली आहे. या संघात 2010 ते 2020 या काळात टी 20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा समावेश असून, क्रिकेट चाहत्यांनीही त्यांना वोटिंग केले आहे. आयसीसीने निवडलेल्या टी -20 संघात 4 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर या संघाची कमानही भारतीय खेळाडूलाच देण्यात आली आहे.

Advertisement

आयसीसीच्या निवडलेल्या टी -20 संघात भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारताकडून या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला या संघाचा स्थान देण्यात आले आहे.

Advertisement

तर वेस्ट इंडिजकडून किरोन पोलार्ड आणि ख्रिस गेल, ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅरोन फिंच. श्रीलंकेच्या एकमेव गोलंदाज लसिथ मलिंगाला या संघात स्थान देण्यात आले आहे. तर अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान देखील आयसीसीने जाहीर केलेल्या संघाचा एक भाग आहे.

Advertisement

आयसीसीने घोषित केलेल्या संघात महेंद्रसिंग धोनीला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची आकडेवारी चांगलीच आहे, कदाचित म्हणूनच चाहत्यांनी मत देताना धोनीला टी -20 संघाचा कर्णधार बनवले आहे.

Advertisement

धोनी कर्णधारांव्यतिरिक्त संघाचा यष्टीरक्षकही आहे, धोनीने 2010 ते 2019 या काळात टी -20 क्रिकेटमध्ये खूपच चांगली विकेटकीपिंग केली, यामुळे चाहत्यांनी त्याला दशकाचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून निवडले.

Advertisement

आयसीसीने जाहीर केलेली सर्वोत्कृष्ट टी -20 इलेव्हन: –

Advertisement

रोहित शर्मा, ख्रिस गेल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी, किरॉन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

भाजपला दे धक्का ! शिवेंद्रराजेच नाही, तर अनेक आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार – नवाब मलिक

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले अनेक नेते…

20 hours ago

बर्थडे स्पेशल : भारतीय संघाच्या संकटमोचकाचा आज वाढदिवस, हे रेकॉर्ड आहेत नावावर, इतक्या कोटींचा आहे मालक

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडला…

23 hours ago

डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात कोविड १९ लसीकरण अभियानाला उत्साहात सुरुवात

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन…

1 day ago

‘कोरोना’च्या लढाईत भारतचं प्रदर्शन हे जगात अव्वल, एका वर्षानंतर आहे ‘ही’ स्थिती

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  जवळ-जवळ एक वर्ष झालंय,  कोविड-19 या साथीच्या आजाराची पहिली…

1 day ago

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

6 days ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

1 week ago