पिवळ्या दातांना मोत्यासारखे पांढरे कसे करता येईल?
महाअपडेट टीम, 27 डिसेंबर 2020 :– दातांमधील पिवळेपणा हा तुमच्या चेहर्याची सुंदरता कमी करण्याचं कारण बणू शकतं. दात पिवळे पडण्याचे खूप कारणे असतात. चुकीच्या पद्धतीने दात घासणे, दारु आणि धूम्रपानाची सवय,कोल्ड्रींक्सच्या सेवनाने दात पिवळे पडतात.जर तुम्हाला दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पहा.
1. एक चमचा मोहरी तेल
२ अर्धा चमचा हळद
३. अर्धा चमचा मीठ किंवा आपण काळे मीठ, सैंधव मीठ देखील वापरू शकता. आपल्या घरात जे काही उपलब्ध आहे.
या तिन्ही घटकांना निट मिसळा आणि ब्रश करण्यापूर्वी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दातांवर लावा. हे मिश्रण 1 ते 2 मिनिटांसाठी दातांवर हळुवारपणे चोळावे आणि दुसर्या सेकंदापर्यंत सोडावे आणि नंतर पाण्याने गार्गल करा. आणि त्यानंतर तुम्ही माऊथ फ्रेशनर देखील करू शकता.
दिवसातून हा उपाय दोनदा करून पहा, तुम्हाला फरक जाणवण्याचा अनुभव येईल
हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे. ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.