पार्थ पवार मंगळवेढ्याची निवडणूक लढणार का ? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात…
महाअपडेट टीम, 27 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या जागेवर पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारत भालकेंच्या निधनानं मंगळवेढ्यात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.
त्यामुळे माजी आमदार औदुंबर पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यावर राष्ट्रवादीचा विजय होईल, असे भाकीत केले होते.
परंतु, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले की, पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत अध्याप कोणतीही चर्चा झाली नाही.
जयंत पाटील म्हणाले की, ‘मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत अशी कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत कोणतही वक्तव्य केलेलं नसल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.