Take a fresh look at your lifestyle.

2021 मध्ये या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप चलणार नाही, यामध्ये तुमचा फोन समाविष्ट तर नाही ना ?

महाअपडेट टीम, 24 डिसेंबर 2020 :– पुढील वर्षापासून, काही अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (IOS) स्मार्टफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सपोर्ट करणार नाही, फेसबुकच्या अधिकृत माहितीनुसार, एक्सपायरी झालेल्या सॉफ्टवेअरसाठी व्हॉट्सअ‍ॅप 2021 मध्ये सपोर्ट करणार नाही.

Advertisement

ज्या युजर्सकडे (Android 4.0.3) ऑपरेटिंग सिस्टम आणि (IOS) 9 नाही.  अशा व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांना 2021 मध्ये हा मेसेजिंग अ‍ॅप अशा डिव्हाइसला सपोर्ट करणार नाही, कंपनीच्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व सेवा आणि फीचर्स सुरू ठेवण्यासाठी युजर्सला त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वर्जन अपडेट करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सना अपडेट करण्याचे सुचविले

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपच्या सपोर्ट पेजवर, युजर्स ला सर्व फीचर्सचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वर्जन अपडेट करण्याचे सुचवले आहे. आयफोनसाठी, फोनला कमीतकमी (IOS 9) आणि Android  युजर्ससाठी (Android 4.0.3)  हे नवीन वर्जन अपडेट केले जाणे आवश्यक आहे.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

आयफोनसाठी आयफोन ४ पर्यंतच्या मॉडेल्सवर व्हॉट्सअ‍ॅप राहणार नाही. आयफोन 4S, आयफोन 5, आयफोन 5S , आयफोन 6 आणि आयफोन 6S वापरत असलेल्या इतर लोकांना व्हॉट्सअ‍ॅप वापरणे सुरू ठेवू इच्छित असल्यास त्यांची ऑपरेटिंग सिस्टम आयओएस किंवा इतर नवीन व्हर्जन अपडेट करण्याची गरज आहे.

Advertisement

अँड्रॉइडबद्दल बोलल्यास, एचटीसी डिजायर, मोटोरोला ड्रॉइड रेजर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 2 या स्मार्टफोनवर 2020 अखेरपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट नसेल. या व्यतिरिक्त काही इतर मॉडेल्सदेखील असू शकतात, बर्‍याच मॉडेल्सची अँड्रॉइड व्हर्जन 4.0.3 आहे.  त्यामुळे ते अपग्रेड करण्याची   आवश्यकता आहे. काही युजर्सना नवीन स्मार्टफोन देखील खरेदी करावा लागू शकतो.

Advertisement

ज्या युजर्सना माहित नाही की कोणती ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहेत, ते तपासू शकतात. त्यासाठी त्यांना सेटिंग्जमध्ये जाऊन फोनशी संबंधित सामान्य माहिती निवडावी लागेल किंवा सेटिंग्जमध्ये फोन बद्दल पर्याय असेल. आणि तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम समजू शकेल.

Advertisement
Advertisement