महाअपडेट टीम, 24 डिसेंबर 2020 :– भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज ओपनर सुनील गावस्कर यांनी टीम इंडिया मध्ये फुट पडली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. टीम मधील आर अश्विन आणि टी नटराजन सारख्या खेळाडूंसोबत अन्याय होत असल्याचे त्यांनी एका इंग्रजी वेबसाईट सोबत बोलताना सांगितले आहे.
मागील बऱ्याच वेळापासून अश्विनला संघर्ष करावा लागत आहे, यासाठी नाही की त्यांच्या गोलंदाजी करण्याच्या क्षमतेमध्ये काही फरक पडला आहे. मात्र यामुळे की तो टीम मीटिंग मध्ये आपली गोष्ट व्यवस्थित मांडू शकत नाही.
दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये त्या गोलंदाजाचे कौतुक केले जाते ज्याने साडेतीनशे विकेट घेतलेल्या आहेत. याबरोबरच त्याने केवळ साडेतीनशे विकेटच नाहीतर चार शतक सुद्धा केले आहेत. जर अश्विनने पहिल्या टेस्टमध्ये विकेट घेतल्या नसत्या तर त्याला दुसऱ्या मॅच मधून ड्रॉप केले गेले असते.असे कोणत्याही एखाद्या मोठ्या फलंदाजा सोबत होताना दिसत नाही. जर तो फलंदाज बाद झाला तरी त्याला वेळोवेळी संधी मिळत असते. मात्र अश्विन साठी नियम एकदम वेगळा आहे.
आणखी एक खेळाडू ज्याच्यासोबत भेदभाव झाल्याचे दिसून येते तो म्हणजे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज टी नटराजन. टी नटराजन संघातील एक नवीन खेळाडू आहे त्याने टी ट्वेंटी मॅच मध्ये सर्वांना प्रभावित केले होते. एवढेच नाही तर त्याने हार्दिक पांड्याने आपला प्लेअर ऑफ द सिरीज सन्मान सुद्धा दिला होता.
नटराजन ला आयपीएल च्या प्ले ऑफ सामन्यांच्या दरम्यान तो बाप झालय असल्याचे कळले होते त्यानंतर त्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड करण्यात आली चांगल्या प्रदर्शनानंतर त्याला ऑस्ट्रेलियामध्ये थांबून घेण्यात आले टेस्ट टीमचा सदस्य म्हणून नव्हे तर प्रॅक्टिस नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आता यावर तुम्ही स्वतः विचार करा असे गावसकर म्हणाले