Take a fresh look at your lifestyle.

आनंदाची बातमी : करोनावरील लस घेण्यासाठी सज्ज व्हा, राजेश टोपेंनी दिली ‘ही’ खास माहिती

महाअपडेट टीम, 17 डिसेंबर 2020 :– मुंबई : कोरोनाचे लसीकरण कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी करोनावरील लसीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली असून डिसेंबरअखेर ही परवानगी दिली गेल्यास जानेवारीपासून लसीकरणला सुरुवात होऊ शकते. लसीकरण तपशीलही कसा असू शकतो याबाबतही टोपे यांनी .
माहिती दिली आहे.

Advertisement

अशी असणार लसीकरणाची प्रक्रिया :

Advertisement

या प्रक्रियेसाठी तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून तेही अंतिम टप्प्यात आहे. मतदानासाठी ज्या पद्धतीने बूथ उभारले जातात त्याच पद्धतीने लसीकरणासाठी बूथ उभारले जाणार आहेत.

Advertisement

तसेच ज्या व्यक्तीला लस द्यायची आहे त्याबाबतचा मेसेज पाठवला जाईल. तो मेसेज आल्यावर तुम्हाला संबंधित ठिकाणी ओळखपत्रासह जायचं आहे. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल. लसीकरणानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तीला तेथेच थांबवण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement