Advertisement

पुणे हादरलं! दोन अल्पवयीन मावस बहिणींवर लैगिक अत्याचार, पाच नराधमांना ठोकल्या बेड्या

Advertisement

महाअपडेट टीम, 17 डिसेंबर 2020 :– पिंपरी चिंचवड :  लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलं. पिंपरी चिंचवडमध्ये दोघा नराधमांनी मावस बहिणींचं अपहरण करून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

15 डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन नराधमांनी हे कृत्य केलं असून या कामात त्यांना तीन मित्रांनी मदत केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, पिपंरी चिंचवडमधील अजंठा नगरमध्ये 15 डिसेंबरला रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान ह्या दोन्ही मावस बहिणी खेळत होत्या.आरोपी आशिष सरोदे आणि करण साबळे हे अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी आले. आले असता त्यांनी या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केले.

Advertisement

नंतर आंधाराचा फायदा घेत घराशेजारी असलेल्या जुन्या कंपनीच्या परिसरात नेऊन आरोपी आशिष सरोदे यांनी एका मुलीवर बलात्कार केला तर दुसरा आरोपी करण साबळे यानं दुसऱ्या पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला.

Advertisement

त्यानंतर दोन्ही पीडितांना जुन्या पुणे-मुंबई हायवेवर आणलं असता त्यांनी तीन मित्रांना  त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर  जबरदस्तीने कारमध्ये  बसवून त्यांच अपहरण केले.  मात्र, चिंचवड स्टेशन चौकात वाहतूक पोलिसांनी कार थांबवली असता आरोपींनी दोन्ही पीडितांना रस्त्यावर उतरवून तिथून पळ काढला होता.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

2 days ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

3 days ago

हृदयद्रावक घटना : फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

महाअपडेट टीम 19 जानेवारी 2021 :-  गुजरात राज्यातील सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना…

4 days ago

मुंडे प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, “जर हा माणूस खोटा असता तर…”

महाअपडेट टीम 15 जानेवारी 2021 :-  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात…

1 week ago

…पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय !

महा अप डेट 15 जानेवारी 2021 :- एकीकडे राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर…

1 week ago