Take a fresh look at your lifestyle.

२४ व्या वर्षी मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडून उभारली होती ओला कंपनी, आता ‘या’ सरकार सोबत उभारणार २४०० कोटींचा इ स्कूटर कारखाना

महाअपडेट टीम, 17 डिसेंबर 2020 :– ओला भारतातली सर्वात प्रसिद्ध कॅब कंपनी आहे आणि आता लवकरच तमिळनाडू सरकार सोबत करार करून ही कंपनी इ स्कूटरचा कारखाना सुरू करणार आहे.

Advertisement

ॲप वर आधारित टॅक्सी सेवा देणारी ओला कंपनी भारतासह विदेशात ही प्रसिद्ध आहे. 2400 करोड रुपयांची इन्वेस्टमेंट करून ओला लवकरच बाजारात आपली इ स्कूटर देखील आणणार आहे. इथपर्यंत प्रवास करण्यासाठी भावेश ला प्रचंड संघर्ष करावा लागला.

Advertisement

भावेश ने केवळ चोविसाव्या वर्षी मायक्रोसॉफ्ट मधली आपली नोकरी सोडून काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतला होता. यासाठी त्याला घरच्यांकडून ना विरोध झाला नाही समर्थन मिळाले. एक प्रकारे त्याला मौन समर्थन होते असेच म्हणता येईल. ओला टॅक्सी ची कल्पना त्याला अमेरिकेत असताना सुचली होती.

Advertisement

त्याचे झाले असे की एक वेळ तो टॅक्सी करून एकेठिकाणी चालला होता. मात्र टॅक्सी चालकानी त्याला जास्त पैसे मागितले यावरून खूप वादविवाद झाले. यावर पर्याय म्हणून त्याने ओलाची सुरुवात केली.

Advertisement

दहा हजार लोकांना रोजगाराच्या नव्या संधी :-

Advertisement

आता कंपनी तामिळनाडू सरकार सोबत करार करून 2400 करोड रुपयांची इन्वेस्टमेंट करून इ स्कूटर कारखाना सुरू करणार आहे. यामुळे तब्बल दहा हजार लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर हा स्कूटर कारखाना जगातला सर्वात मोठा स्कूटर कारखाना ठरेल.

Advertisement
Advertisement