आठ दिवसाची झुंज अखेर अपयशी, महिनाभरात चाळीसगावने गमावला आणखी एक जवान
महाअपडेट टीम, 16 डिसेंबर 2020 :– चाळीसगाव : चाळीसगावातील वाकडी येथील बीएसएफचे जवान अमित साहेबराव पाटील (वय 32) हे बीएसएफमध्ये जम्मू- काश्मीर येथे कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून त्यांचा अपघात झाला होता.
आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु, आज सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चाळीसगाव (वाकडी) येथील साहेबराव पाटील यांचे मोठे चिरंजीव असलेले अमित साहेबराव पाटील हे 2010 मध्ये बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल झाले होते. शहीद जवान अमित पाटील यांचे कुटुंब शेतकरी असून ते सर्वसामान्य कुटुंबातून होते.
जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना आठ दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली होती. त्याच्यावर बीएसएफच्या रुग्णालयात उपचार सुरु होते.अखेर आज पाहते त्यांनी अखेरचा श्वास घेतला.