Take a fresh look at your lifestyle.

वेदनादायक घटना : ट्रक आणि बसची भीषण धडक, ८ जण जागीच ठार, २५ जण गंभीर जखमी

महाअपडेट टीम, 16 डिसेंबर 2020 :–  उत्तर प्रदेशमधील संभळ जिल्ह्यात बुधवारी सकाळी भरधाव वेगात वेगवान बस आणि टँकरची जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील आठ जणांचा मृत्यू झाला असून 24 प्रवासी जखमी झाले आहेत.

Advertisement

यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मुरादाबाद-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील धानारी पोलिस स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे.

Advertisement

बुधवारी सकाळी १०.०० वाजता हा अपघात घडला आहे. सकाळी दाट धुक्यात समोरचं स्पष्ट न दिसल्यामुळे हा अपघात घडल्याचं समोर येतंय. बसमधून जवळपास 45 लोक प्रवास करत होते. यापैंकी ८ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आलं आहे.

Advertisement

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला टँकर ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला आहे.  धडक दिली तेव्हा बस पलटी झाली. बसमध्ये सुमारे 45 लोक होते. ते चंदौसीहून अलिगडकडे जात होते. मृतांमध्ये बस कंडक्टर आणि चालकाचाही समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की टँकरने बसचा बसचा निम्मा भाग हा फरफटत नेल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement