महाअपडेट टीम, 11 डिसेंबर 2020 :-टीम इंडियाचा अनुभवी ओपनर रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोहित शर्मा फीटनेस टेस्ट पास झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला खुशखबर मिळाली आहे.
रोहितला आयपीएलच्या 13 व्या मोसमात त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. यामुळे रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकावे लागले होते. मात्र आता फिटनेस टेस्ट पास झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार आहे.
ऑस्ट्रेलियाला पोहचल्यानंतर रोहितला टीम इंडियासोबत लगेच जुडता येणार नाही. कारण कोरोना नियमांमुळे रोहितला ऑस्ट्रेलियाला पोहचल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच रोहितला सरावासाठी मैदानात उतरता येणार आहे.
त्यामुळे रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागणार आहे. तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात तो संघनिवडीसाठी उपलब्ध असणार आहे.