Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा ’या ‘ दिवशी होणार मतदान

महाअपडेट टीम, 11 डिसेंबर 2020 :- राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सुमारे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या असून १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणाची सुरवात होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Advertisement

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम हा मार्च महिन्यात राबविण्यात येणार होता परंतु कोरोना या संसर्गजन्य आजाराची गंभीर परिस्थिती उद्भवली. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी लागली होती. आता लॉकडाऊनही शिथील झाल्याने परिस्थितीही पूर्वपदावर येत असल्याने नव्याने निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आला आहे. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Advertisement

एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील १५६६ ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीमधील १२, ६६७ अशा एकूण चौदा हजार २३३ ग्रामपंयती मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायती आहेत.

Advertisement

या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान या १४ हजार ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी निवडणुका होत असल्याने गावागावांतील राजकारण चांगलंच तापलेलं दिसणार् आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातच दुहेरी लढत दिसणार् का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Advertisement
Advertisement