रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, आता ट्रेनचे लाईव्ह लोकेशन होणार व्हॉट्सअॅपवर उपलब्ध, ट्रेनचा प्रवासही आरामदायी होईल…
महाअपडेट टीम, 10 डिसेंबर 2020 :- ट्रेनमधील वेटिंग लिस्टची समस्या दूर करण्यासाठी मुंबईतील स्टार्टअप रेलॉफीने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. हे फीचर पीएनआर स्टेटसच्या रीअर टाइमची माहिती आणि प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर रेल्वे प्रवास उपलब्ध करुन देईल.
कंपनीच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी, पीएनआर आणि ट्रेनमधील विलंब, स्टेशन अलर्ट यासारख्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची माहिती. रेलॉफीच्या नवीन या फीचर्सचा आनंद घेण्यासाठी, युजर्सला 10 अंकी हा पीएनआर नंबर व्हॉट्सअॅप क्रमांकावर 9881193322 वर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. यानंतर, आपल्याला थेट स्टेशन अलर्टसह विविध प्रकारच्या ट्रेनची माहिती मिळेल.
या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असतील:-
आतापर्यंत प्रवाशांना ट्रेनच्या प्रत्येक माहितीसाठी वेगळी वेबसाइट वापरावी लागली. परंतु रेलॉफीच्या नवीन वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी ट्रेनशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
या सेवेच्या मदतीने, युजर्सला व्हॉट्सअॅपवर पीएनआर स्टेटससह प्रत्येक नियमित अपडेटची माहिती मिळू शकेल. त्या ट्रेनचं लाईव्ह लोकेशन इत्यादी. बद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकेल.
तसेच येणारे स्टेशन कोणतं असेल याबद्दलही माहिती देखील उपलब्ध असेल. रेलॉफीच्या मते, दरमहा सुमारे 60 लाख प्रवासी गूगलवर आयआरसीटीसी रेल्वे स्थानकाची माहिती शोधतात. पण तेथे उत्तर मिळत मिळण्यास अडचणी येतात.
अशा परिस्थितीत, रेलॉफीचे नवीन फीचर्स उपयुक्त ठरेल. सप्टेंबर 2020 मध्ये याची सुरूवात झाली. त्याच मार्गावरील इतर प्रवासाचे पर्यायसुद्धा स्टार्टअपद्वारे रेल्वेच्या तिकिटाच्या किंमतीत दिले जातात. हे केवळ युजर्सची वेळ वाचवतेच, परंतु प्रवासाची सोय देखील करते.