Take a fresh look at your lifestyle.

कात्रीने सपासप वार करुन पत्नीची हत्या, हत्येनंतर पती खेळत राहिला मोबाइलवर गेम !

महाअपडेट टीम, 08 डिसेंबर 2020 :- राजस्थानच्या बीजेएस कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीच्या गळ्यावर कात्रीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मारहाण केल्याच्या घटनेनंतर सासरच्या लोकानी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री या जोडप्यात जोरदार वाद झाला. या वादात रागाच्या भरात भरत विक्रम सिंग (वय 35) याने पत्नी शिव कंवर (30) मशीनवर शिवणकाम करत असताना कात्रीने सपासप वार करत गंभीर जखमी करून खून केला.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपी बेरोजगार होता, पती बेरोजगार असल्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत असे,  त्यानुनच त्याची पत्नी घरी शिवणकाम करत होती. पोलीस अधिकार्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी सिंहने कात्रीने पत्नीवर सपासप वार केले होते,

Advertisement

पोलिस अधिकारी म्हणाले, “जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला आरोपी मोबाईल फोनवर व्हिडिओ गेम खेळताना दिसला, आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडली होती, त्याला त्याचे काहीच वाट्त नव्हते. त्यांनी सांगितले की घटनेच्या वेळी या जोडप्यास दोन मुले असून ती घरात हजर नव्हती.

Advertisement
Advertisement