महाअपडेट टीम, 08 डिसेंबर 2020 :- भारतातून किती गाड्या परदेशात जात आहेत ? – आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की आपली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. परंतु भारतातून परदेशात जाणार्या आंतरराष्ट्रीय रेल्वे गाड्यांबद्दल आपल्याला माहिती आहे का, आपल्या माहितीसाठी सांगतो भारतातून काही गाड्या दुसर्या देशात जातात , चला तर भारताच्या आंतरराष्ट्रीय गाड्याबद्दल जाणून घेऊयात. भारतातुन शेजारच्या राष्ट्रांत पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये ट्रेन जाते , याशिवाय भारतातून नेपाळपर्यंत रेल्वे ट्रॅक आहे (International Trains of India)
१) मैत्री एक्सप्रेस
ही गाडी 14 एप्रिल 2008 ला सुरू केली होती. ही आंतरराष्ट्रीय सीमावर्ती ट्रेन असून ढाका ते कोलकाता या मार्गावर धावते. मी तुम्हाला सांगतो की ही ट्रेन आठवड्यात एक दिवस दोन्ही बाजुने धावते. भारत आणि बांगलादेश दरम्यान धावणारी ही पहिली ट्रेन आहे, ही ट्रेन 43 वर्षांपासून बंद होती आणि नंतर पुन्हा सुरू झाली.
२.बंधन एक्स्प्रेस
ही ट्रेन 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती. भारत आणि बांगलादेश दरम्यान धावणारी ही दुसरी रेल्वे आहे. ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहे. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावते आणि ही ट्रेन कोलकातापासून 375 किमी अंतर दूर ढाका शहरात जाते.
३.समझोता एक्स्प्रेस
ही ट्रेन भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावते, भारतातुन ही ट्रेन दिल्लीहून पंजाबमधील अटारी रेल्वे स्थानकात जाते आणि त्यानंतर अटारी ते लाहोर या मार्गावर पाकिस्तान रेल्वेचे इंजिन वाघामार्गे घेऊन जाते. परंतु यावेळी, बीएसएफचे कर्मचारी घोडागाडीच्या साहाह्यांने गाडीचे परीक्षण करतात, तसेच ट्रॅक आणि स्वारांवर लक्ष ठेवतात. या ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी केली जाते, त्यानंतरच प्रवासु ट्रेनमध्ये बसू शकतात. दिल्ली ते अटारी या मार्गाचे एकही स्टॉप नाही. ट्रेनमध्ये एकूण 6 स्लीपर आणि 3 थर्ड एसी कोच आहे. ही रेल्वे अनेक वेळा बंदही झाली आहे.
४) थार एक्स्प्रेस
थार ही ट्रेन देखील भारत- पाकिस्तान दरम्यान धावत होती आणि ही भारत आणि पाकिस्तान अंतर्गत सर्वात जुनी रेल्वे सेवा आहे. तसेच, पूर्वी या ट्रेनचे नाव सिंध मेल होते आणि स्वातंत्र्यापूर्वी ही रेल्वे अविभाज्य हिंदुस्थानच्या काळात चालू होती. पण १९६५ च्या युद्धाने रेल्वे ट्रॅक खराब झाला होता त्यामुळे ट्रेन बंद केली होती. त्यानंतर 41 वर्षानंतर 2006 मध्ये ती पुन्हा सुरू केली.