तुम्ही एलआयसीच्या या योजनेत रोज फक्त 121 रुपये भरा, तुमच्या मुलीच्या लग्नात तुम्हाला तब्बल 27 लाख रुपये मिळतील !
महाअपडेट टीम, 06 डिसेंबर 2020 भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) विशेष अशी ही एक स्किम मुलींसाठी आणली आहे. या स्कीममध्ये तुम्ही खूप कमी पैशात गुंतवणूक करूनही तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य उज्वल करु शकाल, सांगायचचं झाल तर सध्या बॅंकिंग क्षेत्र पहिल्यासारखे राहिले नाही.
त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसी ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.आणि लोकही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यामुळे लोकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन (LlC) ने मुलिंच्या उज्वल भविष्यासाठी ही योजना तयार केली आहे….
जाणून घेउयात या योजनेबद्दल…
१ ) मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पैसा कसा कमावू शकता? या हेतुनेच एलआयसीने ही योजना तयार केली आहे. या योजनेला एलआयसीने ‘कन्यादान योजना’ असे नाव दिले आहे. या योजनेत तुम्हाला रोज १२१ रुपये भरणा करावा लागणार आहे. म्हणजे दरमहा सुमारे ३६०० रुपये मासिक प्रीमियमवर ही योजना घेण्यात येउ शकते.
याशिवाय या पॉलिसीमध्ये 25 वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या व्यक्तीला स्वतंत्रपणे 27 लाख रुपये मिळतील. असा फायदा क्वचितच कोणत्याही विमा पॉलिसीमध्ये आढळतो. या दृष्टीने ही योजना खुपच चांगली आहे.
या पॉलिसीसाठी मुलीच्या वडिलांचे वय हे ३० वर्ष असायला हवे. तसेच मुलीचे वय हे १ वर्ष असायला हवे. जरी कोणी या योजनेत बसत नसेल तर वेगवेगळ्या वयोगटानुसार या योजनेत बदल केलेला असतो.
एलआयसीचे हे कन्यादान धोरण 25 वर्षांसाठी घेण्यात येते. त्यासाठी दररोज 121 रुपये किंवा दरमहा सुमारे 3600 रुपये लागतात. जर पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला उर्वरित हप्ते भरावे लागत नाही.
विमाधारकाचा मृत्यू हा आकस्मित झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपये मिळतील. जर विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला १० लाख रुपये मिळतील.
तसेच पॉलिसी पूर्ण झाल्यावर उमेदवाराला एकूण 27 लाख रुपये मिळतील.