Take a fresh look at your lifestyle.

KGF Chapter 2 च्या टिझरची प्रतीक्षा संपली, या दिवशी सुपरस्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज

महाअपडेट टीम, 06 डिसेंबर 2020 :- साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेता यश सध्याच्या काळात आपल्या आगामी ‘केजीएफ’ चॅप्टर 2 चित्रपटात व्यस्त आहे. यशचा चित्रपट केजीएफ चॅप्टर 2 हा 2021 चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.

Advertisement

ज्यामध्ये दक्षिण आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटाची चाहत्यांना बरीच प्रतीक्षा आहे. हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाची अनेक पोस्टर्स समोर आली आहेत.

Advertisement

ज्यात अभिनेता यश आणि संजय दत्त तसेच अभिनेत्री रवीना टंडन यांचा लूक समोर आला आहे. पोस्टर समोर आल्यानंतर चाहते प्रश्न विचारत आहेत की चित्रपटाचा ट्रेलर व टीझर कधी प्रसिद्ध होईल? अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे.

Advertisement

केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटाचा टीझर जानेवारीत स्वतंत्रपणे प्रदर्शित होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश आणि त्याची टीम 8 जानेवारीला चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची योजना आखत असल्याचे म्हटले आहे. 8 जानेवारीचा दिवस खूप खास आहे कारण हा अभिनेता यशचा वाढदिवसही आहे.

Advertisement

या दिवशी अभिनेता यश केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करून आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. जर आपण केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटाबद्दल बोललो तर त्यात संजय दत्त, रवीना टंडन, यश यांच्यासारखे मुख्य कलाकार मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement
Advertisement