Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021- आयपीएलचा 9 वा संघ असेल ‘अहमदाबाद सिटी’, १० व्या संघासाठी ही २ शहरं आहेत आघाडीवर

महाअपडेट टीम, 07 डिसेंबर 2020 :- आयपीएल २०२० च्या यशाने प्रोत्साहित झालेल्या बीसीसीआय लवकरच ‘आयपीएल २०२१’ मध्ये दोन नवीन संघांची निवड करण्याची तयारी करत आहे. बीसीसीआय 24 डिसेंबर रोजी होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची घोषणा करू शकते. म्हणजेच ‘आयपीएल 2021’ मध्ये 8 ऐवजी आता 10 संघ एकमेकांशी भिडताना दिसतील.

Advertisement

बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद शहराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ‘अहमदाबाद सिटी’ आयपीएलचा 9 वा संघ असेल. यासह अहमदाबादच्या मोटेरा येथे स्थित असलेले ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम’ हे लवकरच आयपीएलचे 9 वे ठिकाण बनणार आहे. आयपीएलच्या दहाव्या संघासाठी कानपूर आणि लखनऊ शहराची नावे आघाडीवर आहेत.

Advertisement

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 24 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश करण्याचा निर्णयही घेण्यात येईल. तथापि, ‘अदानी ग्रुप’ने आयपीएलच्या नव्या टीमचा लिलाव करण्यात रस दर्शविला आहे. याशिवाय ‘हीरो ग्रुप’ आणि ‘गोएंका ग्रुप’ देखील आयपीएल टीम खरेदी करू इच्छित आहेत.

Advertisement

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, होणार आयपीएलचे 9 वे स्थान

Advertisement

अहमदाबाद येथील मोटोरा येथे असलेले ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम’ सुमारे ७५० कोटी रुपये खर्च करून ६३ एकर जागेवर बांधले गेले आहे. 1 लाख 10 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम मेलबर्न क्रिकेट मैदानापेक्षा मोठे आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, जे पूर्णपणे तयार आहे.

Advertisement

या स्टेडियमचे काही खास वैशिष्ट्ये.

Advertisement

या स्टेडियमची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘११ विशेष खेळपट्ट्या’, ‘सराव मैदान’ आणि ‘१ इनडोअर क्रिकेट अकादमी’ आहे. या ग्राउंडवर पाऊसामुळे, फारसा त्रास होणार नाही. पावसाचे पाणी काढण्यासाठी येथे एक आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली असून, काही तासात पाऊस पडल्यानंतर हे मैदान तयार होऊ शकते.

Advertisement

बीसीसीआयच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील.

Advertisement

बैठक बोलण्यापूर्वी बीसीसीआयने सर्व मान्यताप्राप्त घटकांना 23 गुणांचा अजेंडा पाठविला आहे. ‘आयसीसी’ आणि ‘एशियन क्रिकेट कौन्सिल’ मध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधी कोण असेल, यावरही बैठकीत चर्चा होईल. यावेळी निवड समितीच्या अध्यक्षांसह 3 नवीन निवडकांचीही निवड केली जाणार आहे. याशिवाय पंचांची उपसमितीही तयार केली जाईल. तसेच ‘नॅशनल क्रिकेट अकादमी’शी संबंधित विषयांवरही चर्चा केली जाईल.

Advertisement
Advertisement