Advertisement

प्रसिद्ध अभिनेते रवि पटवर्धन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

Advertisement

महाअपडेट टीम, 06 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ मराठी अभिनेते रवि पटवर्धन यांचे आज रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केले आहे.

Advertisement

वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.त्याच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

1970 च्या दशकापासून पटवर्धन यांनी करिअरची सुरुवात केली. रवी पटवर्धन यांनी बर्‍याच चित्रपट, टीव्ही कार्यक्रम आणि नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या.

Advertisement

रवी पटवर्धन हे झी मराठीवरील ‘अगबाई सासूबाई’ या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहम्च्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळात पटवर्धन यांनी साकारलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते.

Advertisement

वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले होते. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.

Advertisement

त्यांचा सर्वात गाजलेला लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणजे तेजाब. या चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. झांझर,आणि यशवंत या चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या.

Advertisement

श्वसनाचा त्रास झाल्यानंतर त्यांना ठाण्यातील ज्युपिटर या रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका बसला. त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले त्यांच्या मागे एक पत्नी, तीन मुले आणि चार नातू असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

भाजपला दे धक्का ! शिवेंद्रराजेच नाही, तर अनेक आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार – नवाब मलिक

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले अनेक नेते…

2 days ago

बर्थडे स्पेशल : भारतीय संघाच्या संकटमोचकाचा आज वाढदिवस, हे रेकॉर्ड आहेत नावावर, इतक्या कोटींचा आहे मालक

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडला…

2 days ago

डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात कोविड १९ लसीकरण अभियानाला उत्साहात सुरुवात

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन…

2 days ago

‘कोरोना’च्या लढाईत भारतचं प्रदर्शन हे जगात अव्वल, एका वर्षानंतर आहे ‘ही’ स्थिती

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  जवळ-जवळ एक वर्ष झालंय,  कोविड-19 या साथीच्या आजाराची पहिली…

2 days ago

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

1 week ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

1 week ago