कार चालवताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या कारचा मायलेज 10% ने वाढेल !
महाअपडेट टीम, 06 डिसेंबर 2020 :- जर तुमच्या गाडीने अचानक पेट्रोल किंवा डिझेल प्रमाणापेक्षा जास्त खायला सुरवात केली असेल तर तुम्हाला या सवयी बदलण्याची गरज आहे.आज आम्ही तुम्हाला असे 5 मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कारचे मायलेज 5 ते 10 टक्क्यांनी वाढवू शकता. चला तर मग पाहूया…
१ ) तुमच्या कारचे एअर फिल्टर ब्लॉक असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या कारच्या माइलेजवर दिसून येतो. खरं तर, बहुतेक वेळा इंजिनच्या एअर फिल्टरमध्ये घाण, धूळ किंवा मातीचे कण साचतात, ज्यामुळे ते एयर फिल्टर ला जाम करतात. याचा परिणाम कारच्या इंजिनवर होतो, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो. म्हणूनच, प्रत्येक महिन्याला कारचे एअर फिल्टर तपासून पाहणे आवश्यक आहे.
२) प्रत्येक ट्रिपपूर्वी टायरमध्ये हवेचा दाब तपासला पाहिजे. कारण जर तुम्ही कार कमी हवेत चालविल्यास त्याचा थेट कारच्या माइलेजवर परिणाम होवू शकतो. आपण आपल्या कारच्या टायर्समध्ये नियंत्रित हवा ठेवल्यास तुमचा मायलेज ३% वाढवू शकता. तसेच, तुम्ही जर कारच्या टायर्समधे सामान्य हवेपेक्षा नायट्रोजन हवेचा वापर केला तर तुम्हाला कारच्या रनिंगमध्येही चांगल्या प्रकारची अनुभूती मिळेल.
३) वारंवार ब्रेक लावल्यासही कारच्या माइलेजवर परिणाम होतो. आपण कार जर हायवेच्या तुलनेत शहरांमध्ये चालवत असाल तर ट्राफिक मध्ये वारंवार ब्रेक दाबल्यावर मायलेजमध्ये फरक दिसून येतो. यासाठी ट्राफिक मद्ये अडकले असाल तर इंजिन बंद ठेवणे गरजेचे आहे.
सोप्या भाषेत सांगायचं झाले तर आपण जितक्या वेगाने वाहन चालवाल तितकाच इंजिनचा वापरही होतो, त्यामुळे मायलेजमध्ये कमतरता दिसून येते. याशिवाय 10 किमी प्रतितास वेगाने धावतानाही कार अधिक इंधन वापरते. त्यामुळे हायवे सारख्या रस्त्यावर तूम्ही तुमच्या वेगावर सातत्य ठेवल्यास माइलेज मध्ये फरक दिसून येइल.
वेळेवर कारची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. यामुळे कारचे सर्व भाग आणि इंजिन चांगले कार्य करते. जर जर तुम्ही कारच्या सर्व्हिसिंगला उशीर केला तर कार चे स्पेअर पार्टही खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कारच्या माइलेजमध्ये त्रूटी दिसुन येतील.