Take a fresh look at your lifestyle.

लस घेणाऱ्या मंत्र्यालाही झाली कोराेनाची लागण !

हरियाणाचे आरोग्यमंत्री विज तिसऱ्या चाचणीसाठी स्वयंसेवक बनले होते हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

Advertisement

विज यांनी २० नोव्हेंबरला कोरोनाची स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची पहिली लस घेतली होती. काही काळ ते निगराणीतही होते.

Advertisement

आयसीएमआर व भारत बायोटेक ही लस विकसित करत आहेत. स्वत: विज यांनी आपल्याला संसर्ग झाल्याची माहिती दिली. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याऐवजी ते लोकांच्या भेटीगाठी घेत होते.

Advertisement

पक्षाच्या नेत्यांची भेट घेतल्याची कबुली त्यांनी स्वत: दिली. मंत्री अनिल विज म्हणाले, ‘मला घशात खवखव, ताप आणि अंगदुखी होत आहे.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

मी काही दिवसांपूर्वी पानिपतला गेलो होतो. तेथे २-३ तास एका भाजप नेत्यासोबत होतो. त्यांनाही कोरोना झालेला आहे.’

Advertisement

विज यांच्यानुसार – ‘मला सांगितले गेले होते की, दुसऱ्या डोसनंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होऊ लागतात. पहिल्या डोसच्या २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो.

Advertisement

त्याच्या १४ दिवसांनंतर पूर्णपणे अँटिबॉडी तयार होतात. अशा पद्धतीने संपूर्ण चक्र ४२ दिवसांचे असते. या काळात कसलीही सुरक्षा नसते.’

Advertisement
Advertisement